Tuesday, March 1, 2011

छोट्या छोट्या गोष्टी..........३

सकाळी उठल्यापासून पांघरुणाची घडी घालणे,आंघोळीचे कपडे काढून ठेवणे,बेडवर आंघोळीनंतरचा त्याने तसाच फेकलेला टॉवेल उचलणे,घरातली घालायची शॉर्ट अशीच कोठेतरी भिरकावलेली ती उचलणे, ऑफीसला जातानाचे म्हणून इस्त्रीचे पॅन्ट,शर्ट,रुमाल,आदल्या दिवशी घातलेल्या पॅन्टमधून खिशातले सामान बाहेर काढून ठेवणे.वेळ इकडची तिकडे न होता वेळेवर नाष्टा तयार असणे,त्या शेजारी पाणी पिण्याचा ग्लास ठेवणे, त्यानंतर त्यांनी खाल्लेल उचलून ठेवणे, खाऊन झाल्यावर म्हणून सुपारीचा डबा समोर ठेवणे, घरातील इस्त्री करायचे असलेले कपडे इस्त्रीला ती आपलीच जबाबदारी आहे. ( कारण आता त्या गोष्टी आठवल्या की माझ्या बावळटपणाचे हासू येते.) एखादी अमूक एक पॅन्ट, कींवा शर्ट नसेल तर त्यावरुन तेव्हा कौस्तुभ भडकायचा. आणि त्याक्षणी अनेकवेळा लॉन्ड्रीवाल्याकडे त्याने मला पळवले आहे. त्याचे हे भडकणे टाळण्यासाठी म्हणा कींवा त्यापासून मला होणार असलेल्या मानसिक त्रास टाळण्यासाठी त्याची ही प्रत्येक कामे दबावाखाली ( खरतर तेव्हा ही ती त्याने स्वत:च करणे अपेक्षित होते तरीही )लग्नानंतरची सुरवातीची काही वर्षे मी चोख बजावत असे. खरतर मनात अनेकदा त्या कृतीबद्दल राग यायचा पण आईंपुढे विरोध करण्याची धमक त्यावेळी माझ्यात नव्हती.कारण एकत्र कुटुंबपद्धती.........याविषयी कधीही कौस्तुभकडे तक्रार न करता बिंनडोकासारखी ही कामे करत राहीले. खरतर तेव्हाही त्याच त्याला आपणहून कळावे अशी अपेक्षा मी ठेवत होते.
आता चित्र खूप बदलले आहे.यातील बरीचशी कामे आणि त्याबरोबरच माझी काही कामे (वैयक्तिक माझी नव्हे.आम्हा दोघांची सामाईक असलेल्या कामांपैकी काही कामात कौस्तुभचा सहभाग वाढला आहे.
तसे पाहीले तर बारीक बारीक खूप गोष्टी आहेत की त्याचा जर विचार केला तर त्रासच होणार आहे. जश्या पुरुषांच्या वागण्यात आहेत तश्या त्या आपल्याही वागण्यात आहेतच.नातं बरोबरीचे असेल व कामातील सहभाग बरोबरीने असला तर त्या गोष्टींचा त्रास होणार नाही.यात फरक पडला की मनस्ताप होतो.

3 comments:

  1. खरतर मनात अनेकदा त्या कृतीबद्दल राग यायचा पण आईंपुढे विरोध करण्याची धमक त्यावेळी माझ्यात नव्हती.कारण एकत्र कुटुंबपद्धती......... >>

    माझ्याही बाबतीत असं अनेकदा होत.. तेव्हा मनात विचार येतो.. खरंच एकत्र कुटुंब पद्धती चांगली कि वाईट? कित्येक भावनिक आणि व्यावहारिक फायद्यांसाठी आपण एकत्र कुटुंब पद्धतीला जवळ केले तरी प्रत्यक्षात एकत्र कुटुंब पद्धतीत स्त्रीचीच मानसिक कुचंबणा होतांना दिसते. भावनिक गरजा भागवल्या जाण्याच्या ऐवजी त्यांचे मत दडपून टाकण्याकडे एकत्र कुटुंब पद्धतीचा कल दिसतो. आणि राहिला व्यावहारिक फायद्यांचा प्रश्न तर.. आर्थिक फायदे मिळत असतीलही, उदा. नवे घर घ्यायला न लागणे, काही खर्च शेअर होणे; तरीही घरकामाच्या बाबतीत मात्र कामाची समान वाटणी मला तरी अजूनही एकही एकत्र कुटुंब पद्धतीत दिसलेली नाही. याउलट एकटे राहत असतांना नवर्याला त्याची स्वत:ची कामे स्वत:ला करायला लावणे तुलनात्मकरीत्या सोपे असते असं मला वाटत.. एकत्र कुटुंबपद्धती हि जेवढी जुनी तेवढ्याच तेवढाच स्त्रियांवरचा दबाव जास्त..

    तुम्हाला काय वाटत??

    ReplyDelete
    Replies
    1. कुठल्याही व्यवस्थेचे काही फायदे तोटे असतात. तसे एकत्र कुटूंबव्यवस्थेचेही आहेत. स्त्रियांवर दबाव आहे, तशी सुटकाही आहे, कारण पर्यायी व्यवस्था होऊ शकते.
      कढीतरी यावर सविस्तर लिहिलं पाहिजे.

      http://asvvad.blogspot.in/2010/12/blog-post_31.html

      इथे या चर्चेची सुरूवात आहे.

      Delete
  2. कारण पर्यायी व्यवस्था होऊ शकते. >> म्हणजे एका बाईला दुसऱ्या बाईची मदत मिळते. हे म्हणजे समदु:खी लोकांनी एकत्र येऊन एकमेकांच सांत्वन करण्यासारखं आहे. See.. पर्यायी व्यवस्था (म्हणजे दुसऱ्या बाईची मदत) मिळाल्याने प्रश्न सुटणार नाहीत. उलट घरकाम, स्वयंपाक, मुले सांभाळणे हि बायकांचीच कामे आहेत यांवर शिक्कामोर्तब होत जाईल.

    (हे विधान एकत्र "कुटुंब-पध्दतीमध्ये पारंपारिकता आणि पुरुषांचे वर्चस्व जास्त असते त्यामुळे पुरुषांना कामे सांगणे किंवा त्यांची मदत घेणे अधिकच अवघड होते" या गृहितकावर आधारित आहे. अपवाद असू शकतात. पण तुरळक..

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...